बांधकाम क्षेत्रातील संबंधित बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर, सप्लायर्स, इंजिनिअर्स व संबंधित घटकांची शिखर संस्था असलेल्या राष्ट्रीय पातळीवर कार्यरत बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या स्वमालकीच्या इमारतीतील नुतन कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. याप्रसंगी नुतन पदाधिकार्यांचा पदग्रहण समारंभ आणि जीवन गौरव तसेच गुणवंत कामगार पुरस्कारांचे वितरण असा संयुक्त सोहळा शनिवार 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे, अशी माहिती बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरचे चेअरमन फैयाज गैबान व बिल्डर्स असोशिएशन ऑफ इचलकरंजीचे विद्यमान चेअरमन नितीन धुत, सेक्रेटरी रमेश मर्दा, राजेंद्र शिंत्रे यांनी दिली.बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया ही राष्ट्रीय पातळीवरील संस्था असून देशभरातील बांधकाम क्षेत्रातील कॉन्ट्रॅक्टर, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर, सप्लायर्स, बिल्डर्स, आरएमसी, फॅब्रिकेटर्स, सॅनिटर आदींची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. या असोशिएशनच्या इचलकरंजी सेंटरची स्थापना सन 1990 मध्ये करण्यात आली. या माध्यमातून बांधकाम क्षेत्रातील सर्वच घटकांना भेडसावणार्या समस्या, उद्भवणार्या अडचणी सोडविण्याचे काम केले जात आहे. या सेंटरच्या माणिक एम्पायर सांगली रोड येथील स्वमालकीच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (5 ऑक्टोबर) बी.ए.आय. (वेस्ट झोन) चे उपाध्यक्ष आनंद गुप्ता यांचे हस्ते आणि बी.ए.आय.चे स्टेट चेअरमन अनिल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. यानिमित्ताने इचलकरंजी सेंटरच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल स्व. श्री. ब्रिजलाल जमयतराय हिरानी यांना मरणोत्तर ‘जीवन गौरव’ पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रातील महत्वाचा घटक असणार्या कारागिरींना ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये रामजीव जांगिड (उत्कृष्ठ सुतारकाम), महावीर चौधरी (उत्कृष्ठ फरशीकाम), संजय हेरवाडे (उत्कृष्ठ प्लंबिंगकाम), शिवभरण प्रजापती (उत्कृष्ठ पेंटींग काम), राजू काझी (उत्कृष्ठ सेंट्रींग काम), नागेश नायकर (उत्कृष्ठ गवंडीकाम) आणि वासुदेव वर्मा (उत्कृष्ठ पीओपी काम) यांचा समावेश आहे. या निवडी महांतेश कोकळकी, सुहास अकिवाटे, राजेंद्र खंडेराजुरी व संजय रुग्गे यांच्या समितीने केल्या. हा पुरस्कार सोहळा खासदर धैर्यशील माने यांच्या हस्ते आणि आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती व्हा. चेअरमन शितल काजवे, ट्रेझरर पुंडलिक जाधव, जॉ.सेक्रेटरी दिलीप पटेल व तानाजी हराळे यांनी दिली.याप्रसंगी प्रताप साळुंखे, भगवान कांबुरे, संदीप टारे, पन्नालाल डाळ्या, शिवाजी पोवार, विकास चंगेडीया, प्रल्हाद माने, रामप्रसाद पाटील, ओमप्रकाश खंडेलवाल, श्रीकांत लास्कर, स्वप्निल शहा, मोहन सातपुते, शिवाजी पोवार, विकास चंगेडीया, शिवकुमार हिराणी, राजेंद्र उपाध्ये, महेश महाजन, सुधीर लाटकर आदी उपस्थित होते.
बिल्डर्स असोसिएशन इचलकरंजी सेंटरच्या नुतन कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन व पदग्रहण सोहळा
byVijay Todkar
-
0