हंदेवाडी येथील सुपुत्र पांडुरंग शिवुडकर यांची मुख्याध्यापक पदी बढती

हंदेवाडी येथील सुपुत्र पांडुरंग शिवुडकर यांची मुख्याध्यापक पदी बढती 


हंदेवाडी ता.आजरा येथील सुपुत्र पांडुरंग विष्णू शिवूडकर यांची हु.बाबू गेनु वि.मं.क्र.२८ महानगरपालिका शिक्षण विभाग इचलकरंजी या शाळेत मुख्याध्यापक पदी प्रमोशन झालेने त्यांचा ओम भोलेनाथ विकास संस्थेचे चेअरमन अरुण जाधव,व्हा.चेअरमन रवींद्र पटेकर,संचालिका नंदा शिवूडकर, मनीषा शिवूडकर, विठोबा कातकर, सुरेश कांबळे,पुंडलिक फडके, जनार्दन बामणे,महादेव फडके व सर्व संचालक यांचेवतीने सत्कार करण्यात आला. श्री.शिवुडकर यांची शाळा क्र.५१ व शाळा क्र.१५ या ठिकाणी आतापर्यंत ३४ वर्ष इतकी उल्लेखनीय अशी शैक्षणिक सेवा झाली असून.


त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात विविध पदावर कार्यरत आहेत.तसेच यावेळी समाजसेवक नरसू शिंदे संस्थेच्या वतीनेही नरसू शिंदे यांचेसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी माजी प्राचार्य एम.डी.कदम,पत्रकार पुंडलिक सुतार लोहार,अमर मटकर,अक्षय फडके,गिरीश रेडेकर,अजिंक्य फडके,प्रतीक जाधव,ओंकार नारळकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post