गणेशोत्सवनिमित्त मंगळवार 3 सप्टेंबर रोजी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन

गणेशोत्सवनिमित्त मंगळवार 3 सप्टेंबर रोजी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन 


इचलकरंजी शहर व परिसरामध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. चालू वर्षी देखील शहर व परिसरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सदरचा उत्सव साजरा होत असताना आपल्या शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक मंगळवार दिनांक 3/9/2024 रोजी सायंकाळी सव्वा पाच'च्या सुमारास मराठा मंडळ सांस्कृतिक भवन, तांबे मळा इचलकरंजी येथे आयोजित केली आहे. याप्रसंगी पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार, सुरेशराव हाळवणकर, प्रांतअधिकारी मोसमि चौगुले-बर्डे मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक मा निकेश खाटमोडे-पाटील, अप्पर तहसीलदार शेरखाने, पोलीस उपअधीक्षक मा समिरसिंह साळवे, शिवाजीनगरचे पो.नि.सचिन पाटील, गावभागचे पो.नि.प्रविण खानापूरे, शहापुरचे पो.नि.सचिन सूर्यवंशी, शहर वाहतूक शाखेचे सहा.पो.नि.प्रशांत निशानदार तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी शहरातील सर्व राजकिय पक्षाचे नेते, सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता कमिटीच्या सदस्या तसेच गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आव्हान इचलकरंजी शहर पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post