मथुरा हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

मथुरा हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन 


इचलकरंजी दातारमळा परिसरात असलेल्या श्री मथुरा शिक्षण संस्था संचलित मथुरा हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक एस.जी. चव्हाण व ज्येष्ठ शिक्षक डी.बी.पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगतातून प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका यु.एस.कुंभार यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेतला. अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापक एस.जी.चव्हाण यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील काही प्रसंग व अण्णाभाऊ साठे यांची साहित्यिक विचारधारा यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय.एन.कोथळे यांनी केले तर आभार एस.एस.वारके यांनी मानले. यावेळी भित्तिपत्रक विभागांतर्गत प्रशालेतील काही विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे हुबेहूब चित्रण केले होते. त्यांना प्रशालेच्या विभागप्रमुख पी.पी.जामदार व टी.डी.लोहार यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post