इलेव्हन संघाच्या खेळाडूंची विविध पदांवरती निवडी
इचलकरंजी येथील जिम्नेशियम मैदानवरील इलेव्हन संघाच्या खेळाडूंची विविध पदांवरती निवड झाली आहे यामध्ये ऋषिकेश गंगाराम कांबळे याची महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. तर अमीन रमदान याला आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे तसेच माझी खेळाडू शुभम सुरेश भोसले याची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल इलेव्हन खो-खो संघाच्यावतीने निवड झालेल्या खेळाडूंचे उपस्थित सर्व खेळाडूंच्या हस्ते त्यांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिम्नेशियम मैदान वरील इलेव्हन संघाचे सर्व खेळाडू उपस्थित होते.