कोल्हापूर जिल्हा हॉटेल कामगार संघटना व चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्याचे नेते शिवाजीराव पाटील यांच्या सहकार्याने सोमवार 7 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथील मुख्याध्यापक हॉल येथे हॉटेल कामगारांना आयुष्यमान भारत कार्ड वाटप तसेच माणसिक आरोग्य शिबिर कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून वसुंधरा न्यूज चॅनेलचे संपादक व वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री.विजय तोडकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष हॉटेल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल कांबळे, तसेच मानसोपचार तज्ञ डॉ.पंकज खोत, हाॅटेल व्यावसायिक एस.मिरजे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाचे संयोजक युवा सामाजसेवक कार्यकर्ते नरसू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना अनिल कांबळे यांनी हॉटेल कामगारांच्या समस्या व त्यांच्या व्यथा यावेळी व्यक्त केल्या व हॉटेल कामगार कल्याणमंडळ स्थापन करण्यासंदर्भात कामाचा आढावा घेतला व कामगारांसाठी विमा संरक्षण तसेच इ.एस.आय चालू व्हावे आशा मागण्या यावेळी करण्यात आल्या तर पत्रकार विजय तोडकर यांनी हाॅटेल कामगार संघटनेच्या विविध समस्यांच्या मागणीसाठी वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेलच्यावतीने शासन दरबारी पाठपुरावा करण्यास सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जयराम कांबळे यांनी केले तर आभार युवा समाजसेवक नरसु शिंदे यांनी केले. यावेळी रमेश नाईक, धनाजी भोसले, विजय दरेकर, रवी पाटील आदिंसह हाॅटेल कामगार संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
Tags
स्थानिक बातम्या