ठाणे येथील समृद्धी महामार्गाच्या बांधकामादरम्यान गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट





ठाणे जिल्ह्यातील शहापूर नजीकच्या सरलांबे गावात समृद्धी महामार्गाच्या बांधकामादरम्यान गर्डर आणि लॉंचर कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या ठिकाणाची पाहणी केली. या दुर्घटनेत २० मजुरांना जीव गमवावा लागला. अन्य ३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून हा गर्डर नक्की का आणि कसा कोसळला याची चौकशी सुरू आहे. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने ५ लाख रुपयांची तर केंद्र शासनाने २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय हे काम करणाऱ्या दोन्ही कंपन्यांनी प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांबद्दल आपली सहवेदना व्यक्त केली आहे, असे यावेळी सांगितले. सार्वजनिक बांधकाममंत्री दादाजी भुसे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्यासह एमएसआरडिसीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post