डीकेटीईच्या मेकॅनिकलच्या १२ विद्यार्थ्यांची थरमॅक्स कंपनीत निवड


इचलकरंजी येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल आणि इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमधील मेकॅनिकल विभागातील १२ विद्यार्थ्यांची थरमॅक्स या नामांकीत कंपनीत कॅम्पस इंटरव्हयूव्दारे निवड झाली आहे. उर्जा क्षेत्रातील या अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा इंजिनिअरींच्या विद्यार्थ्यांना होण्यासाठी डीकेटीई व थरमॅक्स यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारातर्ंगत डीकेटीईमध्ये कॅम्पस प्लेसमेंट पार पडला यामध्ये त्यांनी १२ विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी, ग्रुप डिस्कशन, विविध संभाषणाव्दारे व गुणवत्तेच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड केली आहे.थरमॅक्स कंपनी ही उर्जा क्षेत्रातील एक नामवंत कंपनी असून त्यांची वार्षिक उलाढाल ५.५ अब्ज रुपये इतकी आहे आणि उर्जा क्षेत्रातील नवनवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञानामध्ये ही कंपनी अग्रेसर आहे.  डीकेटीई व थरमॅक्स या करारांतर्गत चार महिन्याचा आणि एकूण २०० तासांचा पॉवर प्लॉट इंजिनिअरींग हा कोर्स डीकेटीईतील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग आणि थरमॅक्स यांच्या परस्पर सहकार्याने साकार झाला आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या पॉवर प्लॉट इंजिनिअरींग या विषयाच्या प्रॅक्टीकल ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. या कॅम्पस इंटरव्हयू मधून डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील १२ विद्यार्थ्यांना थरमॅक्स या कंपनीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी मिळाली यामध्ये सम्मेद चौगुले, सौरभ होनमनी, अद्वैत जोशी, ओम कोष्टी, अविनाश पवार, जयेश राव, श्रवण सातपुते, श्रीप्रसाद दुरगडे, अनिकेत नरखेडे, ओंकार निर्मळे, संकेत सुर्यवंशी व यश जावध  हे विद्यार्थी निवड झालेले आहेत. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाशआण्णा आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थ्यांस प्र.संचालिकाप्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे,विभागप्रमुख डॉ.व्ही.आर. नाईक, टीपीओ प्रा.जी.एस. जोशी व सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.




 











Post a Comment

Previous Post Next Post