चक्क देव्हाऱ्या घरातील मुर्ती चोरणाऱ्या शिरोली येथील महिलेस सांगली पोलिसांनी केली अटक

घरात शिरून देव्हाऱ्यावरील चांदीच्या मूर्ती हातोहात लंपास करणाऱ्या वृद्ध महिलेला सांगली पोलिसांनी सोमवारी अटक करून 31 हजार 500 रुपयांच्या चांदीच्या मुर्त्या हस्तगत केल्या या प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची येथील महिलेला अटक करण्यात आली आहे सुप्रभा मंडलीक वय 72 रा.पुराची शिरोली तालुका हातकणंगले असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल जवळ एक वृद्ध महिला संशयास्पद आढळली सदर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून तीची झडती घेतली असता तिच्याकडे गणपती, लक्ष्मी, पिंड, शाळीग्राम याच्यासह ग्लास, वाटी या देवघरातील चांदीच्या वस्तू सापडल्या या संशयित महिलेविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.




Post a Comment

Previous Post Next Post