श्रद्धा जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्सचे सीए फाउंडेशन व बारावी बोर्ड परीक्षेत अतुलनीय यश

श्रद्धा जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्सचे सीए फाउंडेशन व बारावी बोर्ड परीक्षेत अतुलनीय यश


फेब्रुवारी व मे महिन्यात झालेल्या बारावी बोर्ड व सीए फाउंडेशन परीक्षेत श्रद्धा जुनिअर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करीत श्रद्धा कॉलेजची उत्तुंग निकालाची परंपरा कायम ठेवली. कॉलेजमध्ये केल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अध्यापनाची ही फलश्रुती म्हणावी लागेल. तब्बल 27 विद्यार्थी सीए फाउंडेशन परीक्षा क्रॅक करीत पुढील फेरीस पात्र झाले. यामध्ये मापटे शुभम शिवाजी या विद्यार्थ्याने सीए फाउंडेशन परीक्षेत 400 पैकी 315 आणि 12 वी बोर्ड परीक्षेत 93.83% गुण मिळवत नेत्रदीपक कामगिरी बजावली. त्याचप्रमाणे पालक विपुल जजोदिया या विद्यार्थिनीने 12 वी बोर्ड परीक्षेत 96.33% गुण मिळवून इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. याच विद्यार्थिनीने सीए फाऊंडेशन परीक्षेत 248 गुण प्प्राप्त केले. बोर्ड परीक्षेत 90% पेक्षा अधिक गुण मिळविणारे 30 विद्यार्थी, विशेष गुणवत्ताप्राप्त 53 विद्यार्थी आणि तब्बल 13 विद्यार्थ्यांनी अकाऊंटस् विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त करून संस्थेच्या उत्तुंग निकालाची परंपरा कायम राखली. सीए फाउंडेशन व बोर्ड परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन केलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे :- जोशी अनुज राजेंद्रकुमार (293/94%), पाटील मिताली प्रमोद (263/94%), इनानी समीक्षा महेंद्रकुमार (254/94.17%), जेसवानी सन्मित चंदर (206/94.17%), माणगावे पूर्वा प्रकाश (243/94.33%), मळगी उत्कर्ष महेश (265/94.33%), चौगुले भूषण सचिन (231/94.5%), अगरवाल पेहर गौतम (270/94.83%), भुतडा वंशिका रामकिशोर (261/95.17%), मुंदडा अन्वी संजयकुमार (259/95.17%), काटे शिवतेज मधुकर (264/95.67%), डंबाळ वरद सचिन (228/95.83%), झंवर निधी प्रकाश (289/96%), गिड्डे श्रावणी सचिन (203/96%), शाळगावकर अनुष्का आनंद (280/93.5%), जोशी किरण जुगलकिशोर (233/93.17%), बथेजा राशी राम (222/92.83%), सोरप हर्षवर्धन महेश (235/91.83%), करवा नंदिनी सुशील (201/91.5%), मुंदडा जानवी अमितकुमार (223/91.17%), आलासे जयदेव स्वप्नील (225/91.17%), ठोंबरे आदित्य सागर (237/91.17%), पाटील अथर्व अनिल (207/91%), शेटके प्रगती सुनिल (242/89.67%), पाटील पूर्वा राजगोंडा (225/87.83%), भरानी स्वस्तिका संदीप (95.67%) जाधव आकांक्षा चंद्रकांत (93.67%), गुरनानी तमन्ना जगदीश (93.5%), अहुजा जानवी अमर (92.33%), लढ्ढा महक अमितकुमार (90.33%).

वाणिज्य शाखेतील गरज लक्षात घेऊन संस्थेने विद्यार्थ्यांना वेळोवेळी या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या संधी, त्यासाठी लागणारे तयारी या संदर्भात सखोल मार्गदर्शन केलेले आहे. श्रद्धा ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये उत्तुंग निकालासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वगुण विकासावर विशेष प्रयत्न केले जातात. निकालाच्या यशाचे गुणोत्तर अव्वल ठेवण्यात यावर्षीही या कॉलेजने आपली परंपरा अबाधित राखली आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. ए. आर. तांबे, समन्वयक श्री. एम. एस. पाटील, कॉमर्स इन्चार्ज सौ. सुप्रिया कौंदाडे, सौ. संगीता पवार, श्री. अभिषेक तांबे, सौ. सृष्टी तांबे, कॉमर्स को-ऑर्डिनेटर सौ. मधुरा कानिटकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post