श्री आदिनाथ बँकेचा शाखा विस्ताराचा संकल्प ; चेअरमन काडाप्पा

 


रिझर्व्ह बँकेच्या आर्थिकदृष्ट्या सुदृढ आणि व्यवस्थित व्यवस्थापित(एएसडब्लूएम) या बॅकींगमधील चांगली गुणवत्ता व व्यवस्थापन निकषामध्ये श्री आदिनाथ बँक खरी उतरत आहे. त्यामुळे बँकेला नविन शाखा विस्तार करण्यास परवनागी मिळाली असून बँक लवकरच शाखाविस्तार करेल, असे प्रतिपादन श्री आदिनाथ को-ऑप. बँकेचे चेअरमन सुभाष काडाप्पा यांनी केले. दरम्यान, बँकेचे सभासद यशवंत दाडमोडे यांनी बँकेची इमारत सुसज्ज व आधुनिक तंत्रज्ञानांनीयुक्त करावी असे सांगत या वर्षीचा डिव्हीडंड बँकेच्या इमारत निधीस वर्ग करुन घ्यावा अशी सुचना मांडली त्यास सभेने एकमताने मंजूरी दर्शविली. येथील श्री आदिनाथ को-ऑप बँकेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीमंत ना.बा.घोरपडे नाट्यगृह येथे खेळीमेळीत पार पडली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. काडाप्पा बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे व मार्गदर्शक आमदार प्रकाश आवाडे उपस्थित होते. प्रारंभी आद्य तिर्थंकर आदिनाथ भगवान व संस्थापक स्व.आप्पासो मगदूम यांच्या फोटोचे पुजन व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत ज्येष्ठ संचालक बाळासो चौगुले यांनी केले. श्रध्दांजली ठराव श्रेणीक मगदूम यांनी मांडला. अध्यक्षीय भाषणात चेअरमन सुभाष काडाप्पा यांनी यंदा 8 टक्के डिव्हडंड देण्याचे जाहीर केले. 1 हजार रूपये शेअर्सवर बँकेने आतापर्यंत डिव्हीडंड रूपाने 1920 रूपयांचा परतावा दिल्याचे नमुद केले. डिजिटल बॅकींग ही आधुनिक बँकींगमधील क्रांती म्हणावी लागेल. आज जग पेपरलेस कामकाजाकडे वळत असल्यामुळे संगणकीकरण खर्चिक असले तरी गरजेचे आहे म्हणुन बँकेने नविन सॉफ्टवेअर व अनुषंगिक तांत्रिक बाबीं नव्याने घेऊन ग्राहकांना नवनवीन सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच मुख्य शाखेच्या इमारतीत दुसर्‍या मजल्यावर कॉन्फरन्स हॉल बांधकाम करणार असल्याचे सांगितले. चुकीची गुंतवणुक, फसव्या जाहिराती, कमी वेळेत जास्त मोबदला देणार्‍या फसव्या कंपन्या यामुळे लोकांकडील पैसा सुरक्षित राहिलेला नाही. त्यामुळे सभासदांनी आर्थिक नियोजन करणे व आर्थिक साक्षर होणे गरजेचे असल्याचे नमुद केले. नोटीस व अहवाल वाचन उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयकुमार उपाध्ये यांनी केले. सभासदांनी सर्व विषयास एकमताने मंजूरी दिली. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन संचालक मधुकर मणेरे यांनी केले. सभेस संचालक कुंतिलाल पाटणी, अभयकुमार मगदूम, चंद्रकांत मगदूम, सुदर्शन खोत, अनिल बम्मण्णावर, संपत कांबळे, गुरुनाथ हेरवाडे, सुकुमार पोते, सुचित हेरवाडे, सौ. मंगल देवमोरे, सौ.अनिता चौगुले, डॉ. जयकांता बडबडे आदींसह उमेश कोळी, सतिश मगदूम, अ‍ॅड. पवनकुमार उपाध्ये तसेच बाळासो चौगुले, सीईओ जिवंधर चौगुले, मॅनेजर निलेश बागणे उपस्थित होते. सूत्रसंचालन तिर्थंकर माणगांवे यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post