मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आडोशी बोगद्यापाशी थांबून दरडप्रवण क्षेत्राची केली पाहणी




मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्यापाशी गेल्या आठवड्यात दरड कोसळून द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मुंबईहून पुण्याकडे जाताना घाटात काही काळ थांबून या दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली. यावेळी आडोशी बोगद्याजवळ जिथे दरड कोसळून दुर्घटना घडली, त्या ठिकाणी डोंगरावर एमएसआरडीसीच्या वतीने संरक्षक जाळी लावून हा भाग सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे. या कामाची माहिती घेतली तसेच अधिकाऱ्यांना धोकादायक भाग पाडून नंतरच संरक्षण जाळी बसवण्याच्या सूचना दिल्या. तसेच कामशेत बोगद्याजवळ दुसऱ्या ठिकाणी कोसळलेल्या दरडीबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. पुन्हा दरड कोसळून वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी संपूर्ण घाटातील डोंगरातील दरडप्रवण क्षेत्राची नीट पाहणी करून वेळीच उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी या अधिकाऱ्यांना दिले.

Post a Comment

Previous Post Next Post