कोल्हापूर पोलीस दल व इचलकरंजी पोलीस ठाण्याच्यावतीने नागरिकांच्या सोयीकरिता ग्रामसुरक्षादल यंत्रणा सभेचे आयोजन

कोल्हापूर पोलीस दल व इचलकरंजी पोलीस ठाण्याच्यावतीने नागरिकांच्या सोयीकरिता ग्रामसुरक्षादल यंत्रणा सभेचे आयोजन 



इचलकरंजी परिसरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की बुधवार 10 जुलै 2024 रोजी नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे सायंकाळी 4:30 ते 8:30 पर्यंतच्या मुदतीत कोल्हापूर पोलीस दलातर्फे व इचलकरंजी पोलीस स्टेशनच्यावतीने नागरिकांच्या सोयीकरिता ग्रामसुरक्षा दल यंत्रणा अनुषंगाने सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर ग्रामसुरक्षा यंत्रनेमुळे पुणे नाशिक सारख्या मेट्रो शहरांत सदर यंत्रनेच्या वापरामुळे वाढत्या चोरी व दरोड्याणा आळा बसाविण्यात मदत झालेली आहे. तसेच वाढत्या चोरीला आळा बसाविन्या सोबतच समाजात होणारे अनेक वाईट प्रसंग, पूर आपत्ती मधून होणाऱ्या जैविक हानीनवर देखील नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त झालेले आहे. इचलकरंजी शहर हे औ्दयोगीक तसेच महाराष्ट्र राज्याचे मॅंचेस्टर शहर म्हणून संपूर्ण भारत देशात प्रसिद्ध आहे. सदर शहराच्या वाढत्या विकासा सोबत शहरात चोऱ्या व गुन्हेगारी देखील वाढत चाललेचे विदारक दृश्य डोळ्यासमोर दिसत आहे. पोलीस प्रशासनाकडून सातत्याने त्याचे वर आळा घालणे व प्रतिबंध करण्याचे प्रयत्न हे युद्ध पातळीवर केले जातात. तरी देखील आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून समाजाचे काही देण लागत असल्या कारणाने व पोलीस प्रशासनास एक कवडीचा सहकार्याचा वाटा या दृष्टिकोनातून सदर ग्राम सुरक्षा यंत्रणे मध्ये सामील झाल्याने वाढत्या चोरी व चुकीच्या घटनांना लगाम बसाविण्याकरिता एक मोलाचे सहकार्य लाभेल या अनुषंगाने सदर ग्राम सुरक्षा यंत्रनेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन सदर बैठकीस अंगत्याने सर्व पत्रकार, महिला संघटना, सेवा जेष्ठ नागरिक, अंगणवाडी सेविका, माजी नगरसेवक, सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व शासकीय नोकर व अधिकारी बँकेतील कर्मचारी व अधिकारी यांनी या कार्यक्रमास हजर राहावे ही विनंती आहे उपस्थित राहुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्राम सुरक्षा यंत्र णा प्रभावी होण्याकरीता ती ती कशा पद्धतीने काम करते त्याचा डेमो घोरपडे नाट्यगृह येथे नमूद वेळेमध्ये दाखवला जाणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे सदरचा कार्यक्रम सर्वांना पाहण्यासाठी निशुल्क आहे. तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक व इचलकरंजी पोलिस ठाण्याच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post