सिद्धार्थ हौसिंग सोसायटीचा सामाजिक उपक्रम आदर्शवत ; खासदार धैर्यशील माने

सिद्धार्थ हौसिंग सोसायटीचा सामाजिक उपक्रम आदर्शवत ; खासदार धैर्यशील माने 


गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण तसेच स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळावे. यासाठी सिध्दार्थ हौसिंग सोसायटीत सुरु केलेले संगणक प्रशिक्षण केंद्र आणि महात्मा जोतिबा फूले प्रबोधिनीस माझे सर्व सहकार्य राहिल, या भागाचे लोकप्रतिनिधी रवी रजपूते सिद्धार्थ हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद बेलेकर यांनी या कार्यात केलेले योगदान नक्कीच महत्वाचे आहे. हा सामाजिक उपक्रम शहरात आदर्शवत आहे. असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले. ते राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने सिध्दार्थ सोसायटीतील संगणक प्रशिक्षण केंद्र आणि महात्मा फूले प्रबोधिनीचे उद्‌घाटन खास माने यांच्याहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. इचलकरंजी शहरातील आंबेडकर चळवळीच्यावतीने खास माने यांना मानपत्र प्रदान करून नागरी सत्कार करायात आला. या कार्यक्रमाचे स्वागत कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी केले. ते म्हणाले, शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णा भाऊ यांच्या विचारांचा वारसा जपणारा हा प्रकल्प नक्कीच आदर्शवत ठरणारा आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पास सहकार्य करण्याची संधी मला लाभली, हे माझे मोठे भाग्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक प्रकाश मोरबाळे, सयाजी चव्हाण, भंत्ते धम्मदीपजी, भाऊसो आवळे, उत्तम कांबळे, अमर कांबळे, राजाभाऊ कांबळे, अविनाश कांबळे, अमर पारडे, सौ.संगीता कांबळे, प्रदीप कांबळे, उद्योगपती रणजीत लायकर, संदीप कांबळे, डी.एस.डोणे, वंदना मधाळे,मनोहर कांबळे, अमर कांबळे, अविनाश कांबळे, रवी जावळे, भाऊसाहेब आवळे, सौ.अनिता कांबळे, सौ.सुवर्णा बेलेकर, सौ.वैशाली कांबळे, सुनिल जावळे, चित्तरंजन कांबळे, धोंडीराम जावळे, पी.आर.कांबळे, रॉबीन कांबळे, बजरंग उर्फ राजू आवळे, अभिमन्यू कुरणे, प्रवीण चव्हाण आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिध्दार्य सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रदीप कांबळे यांनी केले. तर आभार संस्थेचे चेअरमन बेलेकर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post